गुडघ्यावरील शस्त्रक्रिया एक सुंदर अनुभव ( सौ. शैला अरुण मोहनपूरकर )

माझ्या लेखातील सुंदर हा शब्द अनेकांना खटकेल, परंतु मी घेतलेल्या प्रत्यक्ष अनुभवामुळे हा शब्द वापरायचे धाडस मी करीत आहे. दिनांक 07 नोव्हेंबर 2019 रोजी माझ्या दोन्ही गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली व मी जे बोलले ते किती सत्य आहे, याची मला प्रचिती आली. रुग्णालयातील वातावरण शस्त्रक्रिया करणारे मुख्य डॉक्टर, त्यांना सहकार्य करणारे इतर डॉक्टर्स, सर्व कर्मचारी, या सर्वांनी एकजुटीने केलेले कार्य जेव्हा पूर्ण होते तेंव्हा एक सुंदर परिणाम आपणास अनुभवता येतो, रुग्णा मध्ये एक सकारात्मकता येते व यातना सहन करण्याची शक्ती येते. या सर्वाचा एकत्रीत परिणाम म्हणजे एक सुंदर अनुभव !!

गेल्या तीन चार महिन्यापासून मला तीव्र गुढगे दुखी सुरु झाली होती. अर्थात हा त्रास माला गेले 8 ते 10 वर्षापासून आहे, पण त्याची तीव्रता खूप वाढली. त्यामुळे माझ्या सर्व कऱ्यांवर कामावर एक प्रकारच बंधन येऊ लागले. चिडचिड खूप वाढत होती आणि त्याचे परिणाम घरातील सर्वानाच भोगावे लागत होते. गुडघेदुखीवर जे जे कुणी उपचार सांगत होते ते ते मी करीत होते. पण आराम पडत नव्हता. त्या अवस्थेत मी युरोप दुबई दौरा देखील करून आले. काठी वापरेन पण शस्त्रक्रिया करणार नाही असे ठामपणे म्हणणारी मी, आता माझा विरोध किती लटका आहे. याचा अनुभव घेत होते.

चि. राहुलने चार महिन्यापासून [25 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर] आमचा तिरुपती दर्शन व दक्षीण भारतातील प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्याचा कार्यक्रम आखून ठेवला होता, आरक्षण ही झाले होते. पण प्रत्यक्ष प्रवासास निघण्याच्या वेळेस मला गुडघेदुखीचा व यजमानांना ताप सर्दी खोकला, सोडीयम-शुगर कमी होण्याचा त्रास होत होता आम्ही शारिरीक दृष्ट्या हतबल होतो. केवळ एक जबरदस्त ईच्छाशक्ती व चि श्रीरंग बरोबर होणारे बालाजीचे दर्शन या कारणाने आम्ही सज्ज झालो.

मुलीचे व आमचे सर्व कुटुंबीय असे 11 जण प्रवासाच्या तयारीस लागलो, जीवाभावाचे सर्व सोबत आहेत हा मानसिक आधार आम्ही 25 ऑक्टोबर रोजीच्या रैनीगुठा एक्सप्रेस तिरुपतीस निघालो. 24 तास वातानुकूलीत बोगीतून प्रवास करून हॉटेल मध्ये पोहचलो, तेथील रूम ही वातानुलूलीत होती. त्याचा एकत्रीत परीणाम म्हणून आम्हाला दोघांनाही त्रास सुरू झाला, रवीवारी नरकचतुर्थी, लक्ष्मीपूजन होते. सर्व तरुण मंडळी पहाटे उठून अभ्यंग स्नान करून, तिरुपती

देवस्थानला चढून गेली व दर्शानांनंतर दुपारी परत आली. आम्ही वयस्क माणसे रम मध्ये थांबुन नाश्ता जेवण करून आलो. सायंकाळी जास्तच त्रास व्हायला लागला पाय कुप दुखायला लागले तरीही आम्ही पद्मावतीचे दर्शनास गेलो तिथली रांग व गर्दी पाहून मी तर हात वर केलेबराच त्रास सहन करून आम्ही रम मध्ये परत आलो आमचा त्रास बघून राहुळणे आमचे विमानाचे परतीचे तिकीट काढले मुलांच्या उत्साहात विरजण पडू नये म्हणून आम्ही परत आलो. बालाजीचे छान दर्शन झाले भाऊ विमंतलावर आला होता, ऑबीजेचा दिवस असल्याने जेवणासाठी घरी चालण्याचा आग्रह केला पण आम्ही प्रचंड थकलो होतो विश्रांतीची गरज होती म्हणून प्रेमाने नकार दिला दोन दिवसांच्या विश्रांती नंतर 2 नोव्हेंबरच्या पुतण्याच्या व्याही भोजनाच्या कार्यक्रमासाठी सज्ज झालो मुलेही 3 नोव्हेंबरला परतली.

वरील सर्व लेखन प्रपंच करण्याशिवाय पुढील घडामोडीचे महत्व कळणार्च नाही एव्हाना शस्त्रक्रिये साठीचे, अहेमदाबाद पुणे हे पर्याय बाद होऊन शस्त्रक्रिया औरंगाबाद येथेच धूत हॉस्पिटल मध्ये करायचे ठरले ते आमची ज्येष्ठ मैत्रीण सौ. उर्मीला ताई हर्षे यांनी त्यांचा अनुभव सांगीतल्यावरच !! त्यांची 6 महिन्यापूर्वी शस्त्रक्रिया झाली होती. त्यांचे स्वानुभव कथन व डॉक्टर फुटे यांच्या कौशल्या बाबत ऐकल्यावर आम्ही डॉक्टर फुटेंची भेट घेतली. त्याच्या क्लिनिक मध्ये जाताना माझ्या मनात धड धड सुरु होती, आपण निर्णय घेण्याची घाई तर करीत नाही ना ? पण राहुल सारखे बजावत होता आता निर्णय बादणे शक्य नाही माझा नंबर आल्यावर मी केबीन मध्ये गेले समोरचे डॉक्टरांचे प्रसन्न व्यक्तिमत्व बघून धडपड कमी झाली. डॉक्टरनी सर्व रिपोर्ट्स तपासून माझे सकारात्मक रित्या समुपदेशन करून निर्णय मलाच घ्यायचा आहे असे संगितले मी होकार दिला 5 नोव्हेंबर रोजी एक्स रे ईसीजी रक्त तपासण्या, इन्शुरन्स वैगरे कागदपत्रे तयार झाली. डॉक्टर प्रसाद पाटील यांनी जातीने हे काम केले.

6 नोव्हेंबला 306 नंबरची डीलक्स रम मिळाली. वार्ड मध्ये प्रवेश करताच माला एक गोड धक्का बसला माझा विद्यार्थी डॉक्टर नारायण मनभरे तेथे प्रमुख होता माझी फाईल आधीच वर गेली होती व मी येत आहे हे त्याला कळाल्याने 306 ऐवजी 303 नंबरची रम मिळाली कारण काय तर माला पायरी चढावी लागू नये, एव्हाना डॉक्टरांनी माझ्या मॅडम येणार हे सर्वांना सांगून झाले होते. तेथील स्टाफ च माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन च बदलला किती सुखद अनुभव होता हा ? आपल्या गुरुची सेवा करण्याची सेवा करण्याची संधी मिळाली हा त्याच्या मनातील श्रद्धाभाव होता सायंकाळी डॉक्टर ओकेचे सिग्नल देऊन गेले.

मी शस्त्रक्रियेला तोंड देण्यासतयार झाले सर्व वास सहन करण्याची मानसिकता वाढवली. या सर्व प्रक्रियेत डॉक्टर्स सिस्टर्स कर्मचारी यांची मोलाची साथ मिळाली.

माझी प्रकृती एकदम चांगली होती दुपारी 12 ते 3 दरम्यान माझी शस्त्रक्रिया झाली, तत्पूर्वी मी डॉक्टर्स व सहका-यांना नमस्कार केला. पाटीच्या मणक्यात इंजेक्शन देना-या डॉक्टर मॅडम च हात अगदी फुलासारखा हळूवार होता मला नाव कळले नाही पण मी त्यांना मनापासून धन्यवाद दिले. या इंजेक्शनची माझ्या मनात खूप भीती वाटत होती, कारण ते अतिशय वेदना दायी असते असे ऐकून होते.

दोन्ही पाय अगदी बधीर झाले होते पण मी मात्र पूर्ण जागी होते, काही वेळापर्यंत डॉक्टर फुटेंचा आवाज माझ्या कानावर आला. मी त्यांना नमस्कार म्हटले त्यानंतर त्यांनी कशा आहात असे विचारले. मी मस्त आहे असे म्हटले. आता आराम करा असे ते म्हणाले. त्यानंतर डॉक्टरांचे बोलणे ड्रीलिंग, कटींग, फिटिंग चे आवाज कानावर येत होते डाव्या-उजव्या गुडघ्याचे बँडेज सर्व प्रक्रिया करून 3 वाजता शस्त्रक्रिया संपली.

मी post-operative care यूनिट मध्ये आले. 10 मिनिटानंतर माझ्या पायात सेंसेशन आले आणि परत तोच आश्वासक आवाज सर्व छान झाले आहे. या यूनिट मध्ये डॉक्टर रोहिल ने दिलेला मानसिक आधार खूप प्रेरणादायी होता. त्यांनी पहिले पाऊल उचलताना दिलेली खात्री ड्रेसिंग करताना माझ्या आवडीच्या गप्पा मारून माझ्या वेदना हलक्या केल्या इतरही सर्व डॉक्टर्स सिस्टर्स व कर्माचा-यांचे सहकारी मिळाले. त्यांची नावे माहीत नसल्याने उल्लेख राहून गेला.

एक सुखद अनुभव घेऊन मी तिस-या दिवशी सुखरूप घरी आले. डॉक्टर उदय फुटे, डॉक्टर रोहित, डॉक्टर नारायण मनभरे यांच्या आजन्म कृणात मी राहू इच्छीत व इतर सर्वांना धन्यवाद देते. सौ उर्मिला हरवीचे विशेष आभार आपल्या शहरात येव्हढी सुसज्ज यंत्रणा निष्णात डॉक्टर असताना गरजूनी निश्चित लाभ घ्यावा.

या सुखद अनुभवाबद्दल पुनश्च धन्यवाद!!

सौ. शैला अरुण मोहनपूरकर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *