मणक्याचे आजार समज-गैरसमज

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात मानदुखी, कंबरदुखी, मणक्याचे विकारांनी त्रस्त नसलेला मनुष्य सापडणे जरा अवघडच आहे. सतत बैठे काम, प्रवास, रस्त्यांची दयनीय स्थिती, व्यायामचा अभाव, सदोष राहणीमान या व इतर अनेक कारणांमुळे मणक्यांच्या आजार व त्यांचे प्रमाण दिवसोंदिवस वाढत चालले आहे. मणक्यांचा होणारा जंतुसंसर्ग, अपघातामुळे होणारी मणक्यांना इजा, जन्मतः असणारे वैगुण्य ही षण मणक्यांचे उदभणाऱ्या आजारांच्या कारणांपैकी काही प्रमुख कारणे आहेत.

मणक्यांच्या आजाराबद्दलची माहीती जाणून घेण्यापुर्वी त्यांची शरीरातील नैसर्गिक रचना व त्यांचे कार्य याचा अभ्यास करणे जरुरीचे आहे. माणिचे ७, पाठीचे कण्यात ५, व माकडहाडांचे एकत्रित मणके अशी वैशिष्टपुर्ण रचना असते. यापैकी फक्त कमरेच्या मणक्यांची हालचाल होते. प्रत्येक दोन मणक्यांच्या मध्ये समोरून एक मऊ गादी (Disc) असते. तर मागील बाजुने दोन्ही मनके सांध्यांनी एकमेकांना जोडलेली असतात. मणक्यांचा मधोमध असणाऱ्या या छिद्रातुन नस (Spinal Cord) जात असते. ही नस मेंदुपासुन निघुन खाली माकडहाडांपर्यंत जाते. व प्रत्येक दोन मणक्यांतुन एक उजवीकडे व एक डावीकडे अशा स्वरुपात बाहेर पडते. या नसा शरीराच्या विविध भागांपर्यंत व स्नायुपर्यंत पोहचुन संवेदना व हालचाल करण्याला कारणीभुत ठरतात.

मणक्यांच्या आजाराचे ढोबळमनाने वर्गीकरण खालीलप्रमाणे करता येईल.

१. मणक्यांची झीज (नैसर्गिक ).

२. मणक्यांची गादी सरकणे.

३. अपघाताने होणारी इजा

४. जन्मजात वैगुण्य

५. जंतुसंसर्ग

मणक्यांच्या आजारामध्ये गादीमुळे व त्याच्याशी निगडीत आजाराची टक्केवारी खूप जास्त आहे. हि गादी त्यातील असणाऱ्या जेलीसारख्या पदार्थामुळे (Maeley) आघात सहन करण्याचे काम करते. वयानुसार, कामानुसार आजारांमुळे या गादीतील आर्द्रता कमी होते. हृयामुळे ती कमकुवत होते. व सहन न झाल्यामुळे ती सरकु शकते. सलग बैठे काम, सततचा प्रवास, व्यायामचा अभाव इ. कारणांनी मणक्यांची झीज लवकर होऊ शकते व त्या प्रमाणात रुग्णाला त्याचा त्रास पण अपघात, उंचावरुन खाली पडणे या मुळे मणक्याला फ्रेंक्चर होऊन नसेवर थोडा फार व पुर्ण दाब पडु शकतो त्यानुसार रुग्णांच्या हातापायतील ताकद व संवेदना कमी होऊ शकते.

जन्मजात किंवा वाढीच्या वयात देखील काही मणक्याचे आजार होतात. त्यामुळे पाठीला अनैसर्गिक बाक येणे, मणका सरकणे, त्याची वाढ खुंटणे अशा गोष्टी बघायला मिळु शकतात. तसेच काही प्रमाणात मणक्यांचा होणाऱ्या जंतुसंसर्गाचे प्रमाण पण खुप प्रमाणात आहे. त्याच

बरोबर शरीराच्या इतर काही भागात असलेला कॅन्सरचा आजार पण मणक्यात पसरण्यांची शक्यता खुप जास्त असते.

थोडक्यात आपण मणक्यांच्या होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांची तोंडओळख करुन घेतली. आता आपण ढोबळमानाने त्यावरील वेगवेगळ्या उपचार पद्धतींची माहीती करुन घेणे पण आवश्यक आहे.

अधिकांश वेळेस औषधोपचार व प्रसंगी फिजीओथेरोपी उपयोगी पडतात. या दोन्ही उपचार पद्धतींना मर्यादा असतात. रुग्णाला होणारा त्रास व तपासणी अंती (Xray. CT.MRI.) च्या रिपोर्टनुसार शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो. मणक्याचा शस्त्रक्रिये संदर्भात जनमानसात खुपच गैरसमज पसरलेले आहेत. शस्त्रक्रियेनंतर रुग्ण चालुच शकत नाही, वाकता येत नाही, कायमचे अपंगत्व, चालया शकत नाही. येते. या व इतर अनेक प्रकारचे प्रवाद समाजात पसरले जातात. किंबहुना पसरवले जातात. वास्तव चित्र मात्र या पेक्षा अगदी उलटे आहे. योग्य रुग्णात, योग्य त्या कारणासाठी योग्य त्या सर्जनकडून योग्य वेळी केलेली शस्त्रक्रिया हि यशस्वीच होते. अद्यावत तंत्रज्ञान, आजाराच्या प्रवासाची जाणीव उच्च दर्जाचे प्रशिक्षण या मुळे मणक्यांच्या शस्त्रकियेत आमुल्याग्र क्रांतीच घडून आली आहे.

मणक्यांच्या शस्त्रक्रिया प्रामुख्याने खालील प्रकारे केल्या जातात

१. (Disentomb ) मणक्यांच्या गादी संदर्भात.

२. ( Laminecotomy Laminoplasty ) मणक्यातील नस मोकळी करणे.

३. (Spinal Fusion) मणका पक्का करणे.

४. (Deformity Corruption ) मणक्यांचा बाक सरळ करणे.

५. (V.B.R. ) मणका बदलणे.

वरील पैकी कुठल्याही प्रकारच्या शस्त्रकियेत मणक्यातुन जाणाऱ्या या नसेची पुरेपुर काळजी घेतली जाते. अपघातामुळे मोडलेले मणके, मणक्यांचा कॅन्सर, मणक्यातील जंतुसंसर्ग इ. कारणांनी नसेवर आघात होऊन नस कमजोर किंवा निकामी होऊ शकते. अशा वेळी मात्र शस्त्रक्रिया जरी अत्यावश्यक असली तरी त्यानंतर नस पुर्ववत होण्याची शक्यता कमी असु शकते. तशी त्याबाबतची पुर्व कल्पना रुग्णाला व त्याच्या नातेवाईकांना शस्त्रक्रियेपुर्वीच दिली जाते. या काही कारणांव्यक्तिरिक्त होणाऱ्या शस्त्रकियेदरम्यान नसेला इजा पोहोचण्याची शक्यता खुपच कमी असते.

शस्त्रक्रियेनंतर लागणाऱ्या फिजीयोथेरपीचे महत्व कमी लेखून चालणार नाही. उलटपक्षी शस्त्रक्रियेचे संपुर्ण यश हे त्यानंतरच्या होणाऱ्या (रुग्णांनी केलेल्या व्यायामावर अवलंबून असते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

डॉ. उदय प्र. फुटे

स्पाईन सर्जन

सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल, औरंगाबाद

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *